मंडळातर्फे वेळोवेळी आरोग्य, संस्कार, शैक्षणिक शिबिरे आयोजित करण्यात येतात.
मंडळातर्फे सन २००३ साली आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्या शिबिराचे उद्घाटन तत्कालीन महापौर श्री. महादेव देवळे यांच्या हस्ते करण्यात आले. ह्या
शिबिरात तब्बल अडीच लाख रुपयांची आौषधे वाटण्यात आली. सामाजिक कार्याची गरुडभरारी वर्षागणिक वाढतच राहीली. नंतर मंडळातर्फे नेञचिकित्सा शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले.ह्यात विभागातील १०७४ रुग्णांनी भाग घेतला. तर १८ रुग्णांवर मोफत मोतिबिंदू
शस्रक्रिया करण्यात आली.
छोट्या छोट्या समस्यांची जाण देखील मंडळाने ठेवली आहे. मुंबईकरांना वरदान लाभलेल्या के.ई.म. रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांसोबत बसण्याची व्यवस्था व्हावी, म्हणून १०० टेबलांचे वाटप मंडळातर्फे करण्यात आले.
रक्तदान शिबिर
संपूर्ण मुंबई- महाराष्ट्र सह हिंदुस्थान कोरोनाचा सामना करण्यासाठी सरसावलेला आहे, ह्या लढ्यात एक खारीचा वाटा उचलावा ह्या हेतूने उत्सव मंडळातर्फे जे. जे महानगर रक्तपेढी यांचा सहकार्याने रविवार दि २३/०८/२०२० रोजी सुरक्षित रक्तदान शिबिर